क्राईम न्यूज : पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार

पोलीस  कॉन्स्टेबल शाम जाधव यांच्या विरोधात पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .



प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

   पोलीस असल्याचा गैरफायदा घेत पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत विवाहित महिलेशी मागील सहा वर्षा पासून शारिरिक सबंध ठेवणाऱ्या पोलीस  कॉन्स्टेबल शाम जाधव यांच्या विरोधात पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेण पोलिसांनी आरोपी शाम जाधव याला अटक केली व त्यास न्यायालयात हजर केले असता, त्याला चार जानेवारी आज पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पोलिसाने केली पोलीस ठाण्यात पोलिसांनाच मारहाण -

आरोपी शाम जाधव याच्या विरोधात सदर महिला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता या महिलेची फिर्याद ऐकुण घेत असताना आरोपी शाम जाधव याने पेण पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उप निरीक्षक घाडगे यांना शिवीगाळ केली. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली. तसेच शाम जाधव याला तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आलेले पोलीस शिपाई जाधव याना शिवीगाळ करुन लाथेने मारहाण केली व गुजराथी यांच्या कानाखाली मारली. या याप्रकरणी देखील आरोपी शाम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भा.द.वि. कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शना खाली पेण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post