रायगड जिल्हा तालुका अलिबाग पेझारी जवळ एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या फॅक्टरीवर नवी मुंबई पोलिसांचा छापा

राजकीय लागेबंधे असलेल्या दोघांचा सहभाग..?  

अलिबागेत चर्चा..

अडीच कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त ; तीनजण अटकेत


प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 दोन कोटी 5000000 रुपयाचे ड्रग्ज जप्त तिघे जण अटकेत राजकीय लागेबंधे असलेल्या दोघांचा सहभाग अलिबाग मध्ये मोठी चर्चा

नवी मुंबई । एमडी ड्रग्ज तयार करुन विक्री करणार्‍या तीन जणांना नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अडिच कोटी किमतीचे 2 किलो 500 ग्रॅम एमडी ड्रॅग जप्त करण्यात आले आहे. या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अलिबाग तालुक्यातील पेझारीजवळ ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरीच आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पेझारी....

31 डिसेंबरच्या पार्टीसाठी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती गुप्तचरांमार्फत मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी कारवाई करत, पनवेल तालुक्यातील नेरे येथून कलीम रफिक खामकर याला एमडी ड्रग्जसह अटक केली. अधिक तपासातूून जकीर अफरोज पिट्टू (रा. पनवेल) आणि सुभाष रघुपती पाटील यांना पेण येथून अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून मेथॅक्युलॉन पावडर, एक मारुती स्विफ्ट गाडी, अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल, 5 रुपयांच्या 100 नोटा तसेच 2 कोटी 53 लाख 70 हजार 900 रुपये किमतीचे 2 किलो 500 गॅ्रम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच पेझारीजवळ एका फॅक्टरीमध्ये हे ड्रग्ज तयार केेले जात असल्याची माहिती पुढे आल्यानंतर या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या संबंधातील आणखी दोघांना पेझारी परिसरातून पोलिसांनी अटक केल्याची चर्चा अलिबागमध्ये रंगली होती.

आणखी काही संशयित सापडण्याची शक्यता वरीष्ठ पोलीस निरीक्षक बोलत होते मात्र ज्या दोन नावांची चर्चा अलिबागमध्ये सुरु होती, याबाबत तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती माळी यांनी दिली. दरम्यान, ड्रग्ज बनवण्याची फॅक्टरी अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे आढळून आल्यामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, मोरे, कोळी, पाटील, पाटील, जेजूरकर, फुलकर, बोरसे, सोनवलकर, तसेच एएचटीयुचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पराग सोनावणे, तसेच अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी एस सय्यद, विजय शिंगे, इनामदार, उटगीकर, पिरजादे, कांबळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

Post a Comment

Previous Post Next Post