एडवोकेट तन्वीर जाहगीरदार यांनी निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रेस मीडिया :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपातील तरुणाची एडवोकेट तन्वीर जहागिरदार यांनी केलेला जोरदार युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष कोर्टाचे न्यायाधीश के.के. जहागीरदार यांनी निर्दोष मुक्तता केली आहे . आरोपी ऋषिकेश मोहिते याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी २०२०रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती . पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते .
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिला भेटण्यास बोलावून घेऊन तिच्या सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता . या प्रकरणातील आरोपीवर बाल लैंगिक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.
पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती . या गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश किसन मोहिते याची विशेष कोर्टाचे न्यायाधीश के.के. जहागीरदार यांनी निर्दोष मुक्तता केली आहे .
या खटल्यात सरकार पक्षा कडून तीन साक्षीदार तपासण्यात आले होते . तर आरोपीच्या वतीने दोन साक्षीदार तपासण्यात आले . आरोपीचे वकिल तन्वीर जहागिरदार यांचा खर्याला खरे आणि खोट्याला खोटे सिद्ध करण्यासाठी उलट तपासणी अहवाल सादर केल्यानंतर पुणे येथील जलदगती विशेष न्यायालयाचे न्यायाधीशके.के. जाहागीरदार यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली .
एडवोकेट तन्वीर जाहगीरदार यांनी निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क प्रेस मीडिया लाईव्ह*