पोलिसांनी मास्कची कारवाई केल्यानंतर एका तरुणीने फिट येण्याचे नाटक केले

तरुण जोडप्याची महिला पोलिसांना शिवीगाळ व मारहाण.

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

जीलानी ( मुन्ना ) शेख  :

 पुणे - पोलिसांनी मास्कची कारवाई केल्यानंतर एका तरुणीने फिट येण्याचे नाटक केले. तर तीच्या साथीदार तरुणाने महिला पोलिसांना शिवीगाळ करत अपमानास्पद वागणून दिली. या नंतर दोघांनी धनकवडी पोलीस चौकीत येऊन गोंधळ घातला.त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांनी महिला पोलिसांना मारहाण केली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश रविंद्र आडम (25,रा.साईबाबा मंदिरा शेजारी, कात्रज) आणि करुणा रमेश राऊत (25,रा.बालाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महिला पोलीस शिपाई पुजा तिकडे या मंगळवारी रात्री धनकवडी येथील राजश्री शाहू बॅंक चौकात सहकाऱ्यांसह मास्कची कारवाई करत होत्या. यावेळी दुचाकीवरुन आकाश व करुणा हे दोघे विना मास्क चालले होते. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, ते कट मारुन पुढे गेले. यानंतर पुन्हा मागे येऊन फिर्यादीच्या अंगावर धाऊन आले. 

दरम्यान करुणा हिने फिट येण्याचे नाटक केले. तीला फिट आल्याचे सांगत आकाश याने महिला पोलिसांना शिवीगाळ केली. यानंतर झटापट करुन ते निघुन गेले. यानंतर काही वेळाने दोघांनी धनकवडी पोलीस ठाण्यात येऊन आरडा ओरडा केला. याचे व्हिडिओ शुटींग महिला सहायक पोलीस निरीक्षक मदने करत असताच त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर मदने आणि महिला पोलीस नाईक यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post