भविष्यात भयंकर उपासमारी व बेरोजगारीच्या खाईत लोटले जातील असं भाकीत होत आहे.
प्रेस मीडिया ऑनलाईन
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
बेकायदा बाईक टॅक्सी बाबत सरकार व परिवहन मंत्रालय बघ्याची भूमिका घेऊन त्यांना अभय देतोय का ? आता असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण अद्याप परिवहन मंत्रालयाकडून बेकायदा दुचाकी टॅक्सी वाहतूक करणाऱ्या ओला, उबेर , रॅपिडो या कंपन्यांवर काहीच कारवाई होताना दिसत नाही. रिक्षावाले सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाला हे निवेदन करत आहे, की बेकायदा दुचाकी टॅक्सी प्रवासी वाहतूक ॲप बंद करा, ओला ,उबर , रॅपिडो यांची बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी प्रवासी वाहतूक पुणे पिंपरी-चिंचवड शहरात धुमधडाक्यात चालू आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर जबरदस्त परिणाम झालेला दिसत आहे. शासनाचा परवाना घेऊन कायदेशीर प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक उपासमारीकडे लोटले जात आहे, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकणारा रिक्षाचालक प्रभावित झालेला दिसत आहे. दिवसातन दोन शे ,पाचशे रुपये कमवने अवघड झाले आहे.
रिक्षावाल्यांनी आत्महत्याच करावी असाच प्रयत्न होत आहे का ? अशी शंका निर्माण झालेली आहे. या बाबत प्रेस मीडिया पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली यांनी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड च्या विविध भागांमध्ये रिक्षाचालकांचा आढावा घेतला प्रत्येक रिक्षाचालक बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी वाहतुकीमुळे प्रभावित झालेला दिसत आहे, सगळे रिक्षावाले एका स्वरात म्हणतात की दुचाकी टॅक्सी वाहतूक बंद झाली पाहिजे परंतु पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रिक्षा संघटना यावर मौन बाळगून आहे. त्यांच्या मनात काही वेगळेच शिजतंय का ? अशी शंका रिक्षाचालक व्यक्त करीत आहेत. आजच्या आढाव्यात ही गंभीर बाब समोर आली आहे .
पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड शहरात लाखोच्या संख्येने रिक्षावाले आहेत त्यांची मतं माघणारी विविध पक्षातील नेते मंडळी बघ्यांच्या भूमिकेत दिसत आहे. आणि परिवहन मंत्रालय आपल्या डोळ्यावरची पट्टी कधी काढणार आणि संबंधित विभागाला ओला ,उबेर, रेपिडो कंपनीला ला बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी वाहतुकी चा ॲप बंद करण्यासाठी आदेश कधी देणार.? असे मत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील रिक्षावाले व्यक्त करत आहे.
आढावा दरम्यान कात्रज येथील एका रिक्षावाल्याने मत व्यक्त करताना सांगितलं आज आपण या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधातील लढाईत एकत्र येऊन रस्त्यावर उतरलो नाही तर रिक्षाचालक व त्यांची परिवार भविष्यात भयंकर उपासमारी व बेरोजगारीच्या खाईत लोटले जातील असं भाकीत होत आहे.