या क्रूर व निर्दयी नराधमांस जर आपण कुठे पाहिले किंवा ओळखत असाल तर पोलिसात तात्काळ तक्रार दाखल करा.
प्रेस मीडिया ऑनलाईन
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पुणे दि १२. आज सकाळ पासून सोशल मीडिया वर एक चित्रफित व्हिडिओ वायरल झाला आहे ज्या मध्ये एक क्रूर व माथेफिरू नराधम एका लहान दूध पिणाऱ्या चिमुकल्या बालकाला अगदी क्रूर पणे जोर जोरात मारताना दिसत आहे. या मारहाणमुळे बाळ जोर जोरात रडत आहे त्याला वाचवण्यासाठी मदत करणारा जवळ पास कुणी दिसत नाही, ज्याने हा व्हिडीओ बनवला आहे तो सुद्धा वाचवत नाही याचा अर्थ काही तरी गंभीर बाब आहे .
या क्रूर व निर्दयी तरुणाला जर आपण कुठे पाहिले किंवा ओळखत असाल तर पोलिसात तात्काळ तक्रार दाखल करा, हल्ली लहान मुलावर हल्ले वाढले आहेत, लहान मुलांना मार हाण करण्याचे प्रकार आपण नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा बातम्यांच्या माध्यमातून नेहमी पाहत असतो अशा क्रूर आणि मनोविकृत व्यक्तींना गजाआड पोहोचवणं हे आजच्या काळातील जागरूक नागरिकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे.