पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वेसेवा पूर्ववत सुरू
प्रेस मीडिया :
अनवरअली शेख :
पुणे : सकाळी साडेनऊ च्या सुमारास पुणे स्टेशनच्या नजीकचे डेमुचे काही डबे रुळावरून खाली घसरले होते. प्रकार समजताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचा-यांची धांदल उडाली होती.
दरम्यान डेमू रेल्वे रुळावरुन घसरल्याने वाहतुक कोंडी झाली होती. यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता. ही रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडली दरम्यान, सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
पुणे स्थानकात मेमू गाडीचा एक डबा रुळावरून घसरला
यार्डातून स्थानकात गाडी येत असताना घडली घटना
सकाळी 9.45 च्या सुमारासची घटना
प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम