महावितरणनची वसुलीच्या नावाखाली वीज कनेक्शन तोडण्याची सर्रास लूट सुरू.



प्रेस मीडिया ऑनलाइन :

अनवरअली शेख :

 पुणे : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून वसुलीच्या नावाखाली वीज कनेक्शन तोडण्याची सर्रास लूट सूरू केली आहे. ही लुटीची कारवाई थांबवून शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोल, डिपी, मनोरा टॉवर यासाठी वीज कायद्यानुसार नुकसान भरपाई व भाडे द्यावे.अन्यथा रविवार (ता.२३) पासून शिरूर महावितरण कार्यालयासमोर सुरुवातीस धरणे व त्यानंतर बेमुदत अमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला.


शेतकऱ्यांना विज कायद्याची माहिती नसल्याने त्यांचा गैरफायदा घेऊन महावितरण व राज्य शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न देता त्यांची फसवणूक केली जात आहे. शिरूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे शेती पंपाचे विज कनेक्शन व डी. पी. कनेक्शन ताबडतोब सुरू करण्यात यावेत. शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पोल, ट्रान्सफॉर्मर, हायटेन्शन टॉवर पोल, याचे नियमाप्रमाणे पहिल्या दिवसापासूनचे भाडे त्यावरील व्याज व फरकाची रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यात यावी.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची डी. पी. बसविल्याचा दिनांक, स्थळ, डी. पी. नादुरुस्त किती वेळा झाली, किती वेळा बदलली, किती वेळा दुरुस्त केली. त्यासाठी किती खर्च आला याबाबत वरिष्ठ कार्यालयाला दिलेला अहवाल, वरिष्ठ कार्यालयातून खर्चाची मिळालेली मंजुरी याची माहिती द्यावी. तालुक्यातील शेतातील वीज पोलची संख्या, डी.पी.ची संख्या त्यासाठी विज़ कंपनीने प्रतिमहा भरपाई भाड़े दिल्याची रक्कम (वीज कायदा २००३ व लायसन्स रुल २००५) याची गावनिहाय माहिती देण्यात यावी. तालुक्यात शेतकरी डी. पी. निहाय दरमहा होणारा विजवापर, विजपुरवठा किती तास सुरू व किती तास बंद याची माहिती देण्यात यावी. महावितरणच्या तिन्ही कंपन्यांचे कंपनी स्थापन झाल्यापासूनचे लेखा परीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल उपलब्ध करून द्यावेत. विजेच्या शॉकने जखमी व मेलेल्या, जनावराची, माणसांची संख्या व त्यांची संपूर्ण भरपाईची दिलेली रक्कम याची माहिती देण्यात यावी. बिघडलेल्या ट्रॉन्सफार्मर ४८ तासात महावितरणने सुरू केलेल्या ट्रॉन्सफॉर्मरची संख्या, ४८ तासानंतर सुरू केलेल्या ट्रान्सफॉर्मची संख्या त्यासाठी प्रतितास ५० रुपयेप्रमाणे दिलेली नुकसान भरपाई, नुकसान मिळालेल्या शेतकऱ्याची माहिती देण्यात यावी. थकबाकी वादग्रस्त बिल या करिता वीजपुरवठा बंद करण्यासाठी केलेल्या स्वतंत्र नोटीसची प्रत देण्यात यावी. यांसह विविध २४ मागण्यासाठी शिरूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post