अनाथांचा माय सिंधुताई सपकाळ यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी.

संस्थेच्या बाहेर नागरिकांची गर्दी..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

जीलानी (मुन्ना) शेख :

 पुणे | अनाथांचा माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी निधन झालं. हद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं रात्री 8 वाजता निधन झालं आहे.त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. आज पुण्यात ठोसर पागा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सिंधुताई यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजता मांजरीतील बालनेिकेतन येथे आणण्यात आले होते. सकाळपासून त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बालनिकेतन येथे हजारोंच्या संख्येने लोक येत आहेत. त्यांच्या मांजरीतील बालनिकेतन या संस्थेच्या बाहेर नागरिकांनी लाबंच लाबं रागं केल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

सिंधुताईना आज सकाळी शासकिय इतमामात सलामी देण्यात आली आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर बुधवारी महानुभव पद्धतीने अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंधुताई सपकाळ यांना मागील वर्षी पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला होता. सिंधुताई यांना राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय मिळून 750 पुरस्कार मिळाले आहेत.

दरम्यान, दिड महिन्यापूर्वी सिंधुताईंना हार्नियाच्या त्रासामुळे हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची त्यांनतंर हार्नियाची शस्त्रक्रिया देखील झाली होती. त्यानंतरही त्यांच्यावर उपचार चालूचं होते. मात्र, मंगळवारी त्यांच्यावर उपचार चालू असतानाचं त्यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post