स्थानिक पोलीस ठाणे कडून तक्रार अर्ज घेण्यास नकार.
प्रेस मीडिया
पुणे : जीलानी (मुन्ना) शेख :पुणे - भवानी पेठेतील लाकूड आणि फर्निचर व्यवसायीकांना गर्दुल्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या गुर्दुल्यांना हटकण्याचा प्रयत्न करताच ते सरळ अंगावर धाऊन येत जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत.यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज देण्याचा प्रयत्न केला असता, ते तक्रार स्विकारत नसल्याचे व्यापारी संघटनांतर्फे सांगण्यात आले. यामुळे कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न व्यपाऱ्यांना पडला आहे.
यासंदर्भात अंगडशा बाबा व्यापारी संस्थेच्यावतीने अध्यक्ष सिराज ईस्तयाक अहमद शेख यांनी एक निवेदन दिले आहे. त्यानूसार भवानी पेठ परिसरात रात्रीच्या वेळी तसेच रविवारी दुकानांच्या आडोशाला स्थानिक तरुण दारू आणि गांजा पित बसतात. नसेमध्ये पेटलेल्या सिगरेट व गांजाची थोटके इकडे तीकडे टाकतात. परिसरात सर्वत्र प्लायवुड, हार्डवेअर आणि लाकडाची दुकाने व सॉ मिल असल्याने आग लागण्याचा मोठा धोका आहे. मध्यंतरी येथे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या टोळक्यांना हटकण्याचा तसेच समजावण्याचा प्रयत्न करता ते अंगावर धाऊन येतात. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात येते. काही दिवसांपुर्वी टारगट तरुणांनी संस्थेचे कार्यालय देखील जाळले होते.
'व्यसनी तरुणांच्या टोळक्यांमुळे परिसरातील व्यापारी हैराण झाले आहेत. या तरुणांकडून व्यापाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येतात. पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, ते तरुणांची नावे लिहून द्या तरच तक्रार घेऊ अशी भूमिका घेत आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालणे आवश्यक आहे. तरच असे प्रकार थांबू शकतात'
- सिराज शेख ( अध्यक्ष, अंगडशा बाबा व्यापारी संघटना )