राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष सुषमा सातपुते यांच्या वतीने

 पुणे शहरात 'घेऊ भरारी' हा उपक्रम राबवण्यात येत आहे

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

जीलानी (मुन्ना) शेख :

पुणे - राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष सुषमा सातपुते यांच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात 'घेऊ भरारी' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, पुणे येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या उपक्रमांतर्गत पुणे शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये पॅड वेंडींग मशिन्स बसवण्याचा संकल्प पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

मुलींच्या, महिलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने 'मासिक पाळी' हा विषय अतिशय महत्वाचा आहे. घेऊ भरारी या अभियानाच्या माध्यमातून थेट शाळा व महाविद्यालयीन युवतींना सॅनिटरी पॅड वितरित करून मासिक पाळी बद्दल असणारे न्यूनगंड दूर करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींचा आत्मविश्वास दुणावून त्या अधिक कणखरपणे समाजात वावरताना दिसतील, या अनुषंगाने 'घेऊ भरारी' हे अभियानाचे नाव अतिशय समर्पक आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून आमचा करण्याचा प्रयत्न आहे, असे सातपुते यांनी सांगितले.

याप्रसंगी पुणे शहर अध्यक्ष आदरणीय प्रशांत जगताप यांच्या हस्ते कार्यक्रमाचं ओपनिंग करण्यात आले. यावेळी डॉ. अर्चना अग्रवाल यांनी मासिक पाळी व सॅनिटरी पॅडचे महत्व या विषयांवर उपस्थितांना मौल्यवान मार्गदर्शन केले. यावेळी महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, ज्येष्ठ नेते अंकुशआण्णा काकडे, नगरसेवक बंडूतात्या गायकवाड, महिला शहराध्यक्ष मृणालिनीताई वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, विद्यार्थी शहराध्यक्ष विक्रम जाधव, माथाडी कामगार सेलच्या शहराध्यक्ष विशाखाताई गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post