कोण आहे माझा कैवारी..? जो मला माझ्या समस्यांपासून सुटका करून देईल...?
प्रेस मीडिया :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
एक ऑटो रिक्षा वाला मला माझं दुःख, माझ्या अडी अडचणी आणि मला होणारा मानसिक त्रास कुणाला सांगू.. ? कोण आहे माझा कैवारी..? जो मला माझ्या समस्यांपासून सुटका करून देईल...???
कोरोना काळात अनेक अडी अडचणी , उपासमारीला तोंड देत कसे का होईना कसा बसा संसाराचा गाडा वर्ष भर ओढून ताणून चालविला ,पण आता शक्य नाही . नेता , समाजसेवक कोणी साधी चौकशी केली नाही व विचारायला सुद्धा आले नाहीत . एक रिक्षावाला रोज कमावून सायंकाळी घरच्यांचे पोट भरणारा सहा सात महिने कसा जगला आसावा..? ते रिक्षा वाला ही सांगू शकतो.
तरी पण खंबीर राहून अगदी हिम्मतीने कोरोणा काळात काम करत राहिलो , कोरोना जसा जसा ओसरू लागला तसे हळू हळू पुन्हा एकदा गाडी रस्त्यावर धाऊ लागली पण मंदी मुळे काय करावे काय कळत नव्हतं . लॉकडाऊन मध्ये परत शासनाला सहकार्य करत घरी राहून उपासमारी सहन करून रिक्षावाला जगू लागले. पण आता जगणं फार मोठ अवघड झालं आहे.जेव्हा पासून दुचाकीवर प्रवासी वाहतूक चालू झाली तेव्हा पासून रक्षा व्यवसायास जोरदार फटका बसला . रिक्षचालकांनी जो शासनाच्या आदेशानुसार परवाना घेऊन व्यवसाय करत आहेत त्याला आता प्रतिस्पर्धी म्हणून विना परवाना दुचाकी टॅक्सी विना बॅच , विना ( TR ) पब्लिक वाहतूक लायसेन्स धारक उभा केला आहे. बेकायदेशीर असताना देखील ॲप कंपनी धारकांनी,आणि शासन, प्रशासन त्यांच्यावर अजून काही कड्क कायदेशीर कारवाई केलेली नाही . का केलेली नाही याचे कारण गुलदस्त्यात आहे.
रिक्षावाल्याला न्याय कोण देणार ..? रिक्षावाल्याला संपवण्यासाठी पोटावर पाय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुंड आता या व्यवसायात उतरले आहेत . माझ्या सारख्या चाळिशीतील रिक्षाचालकांना दम दाटी करून पोटावर पाय देण्याचा काम करत आहे,
आता रिक्षावाल्याला न्याय कोण देणार...?,आमचं दुःख कोण दूर करणारं..?, आम्हीही नागरिकच आहोत आमच्याही समस्या आहेत, आता सरकारनेच आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो .