उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने आणि त्यांच्याच मोबाईल नंबर वरुन पुण्यातील एका बिल्डरकडे

 तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला 

 गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ६ जणांना अटक केली आहे


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख :

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने आणि त्यांच्याच मोबाईल नंबर वरुन पुण्यातील एका बिल्डरकडे तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तुमचा प्रोजेक्ट आम्ही गावात होवू देणार नाही, अशी धमकी देत या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ६ जणांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण.. ?

पुणे शहरातील एका बड्या बिल्डरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचं सांगणारा फोन आला होता. ॲपद्वारे अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करुन आरोपींनी त्यावरुन बांधकाम व्यवसायिकाला फोन केल्याची माहिती आहे. बिल्डरकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले.

दहा दिवसांपासून धमक्या..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलत असल्याचं सांगून आरोपींकडून 13 जानेवारीपर्यंत दहा दिवसांपासून धमकीचा प्रकार सुरु होता. अखेर बिल्डरने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.

सहा जणांना अटक..

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post