परवाना धारक रिक्षावाल्यांच्याच पोटावर पाय देण्यासाठी योजनापूर्वक तयारी

विनापरवाना पळतोय जोमात, परवानाधारक जातोय कोमात...



प्रेस मीडिया ऑनलाईन :

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

रिक्षावाल्यांनी जगावं की मरावं..?  असा प्रश्न निर्माण झाला आहे, वाढती महागाई त्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनचा व्यवसायावर झालेला दुष्परिणाम, शाळेची फी,  मुलांच्या कॉलेज फी, महा वितरणाचा बिल भरणा,घर खर्च,घरातल्या वयस्कर   आई बाबा, आजी आजोबा यांचा दवाखान्याचा खर्च,गाडीचे थकलेले बँक कर्ज, फक्त दहा रुपय-चा चहा प्यायला पण रिक्षचालकांना विचार करावा लागत असताना  रिक्षावाल्यांच्याच पोटावर पाय देण्यासाठी योजनापूर्वक तयारी करत वाहतूक ॲप कंपनी वाल्यांचा उद्रेक चालू झाला आहे. कुठलाही शासनाचा  प्रवासी वाहतूक परवाना नसताना सुद्धा पुणे पिंपरी चिंचवड मध्ये बिनधास्त कंपनीने दुचाकी प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी ॲप चालू केले आहे जणू ॲप कंपनी धारकांनी स्वतःला परिवहन मंत्रालय समजू लागली आणि ॲपच्या माध्यमातून इच्छूक चालकांची नोंदणी करून बाइक टॅक्सी सेवेला प्रारंभ केला. कोणत्याही वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून परवाना मिळविणे आवश्यक असते. शहरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही कंपनी ही सेवा धीट पणे पुरवू लागली आहे,  त्याअनुषंगाने  वाहतूक विभागाला अशा बेकायदा बाइक टॅक्सींवर कारवाई करण्याचे आदेश आले पाहिजे होतेत्या मुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्या या  दुचाकी चालकांवर पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम ६६ (१), सहकलम १९२ (अ) अंतर्गत कारवाई   झाली पाहिजे या ऑनलाइन ॲपला शासनाची मान्यता नसून पण कोणाच्या आशीर्वादाने हे  बेकायदेशीर कृत्य  करत आहेत..?

अवैध प्रवासी वाहतूक (कलम 66/ 192 अ) :- विना परवाना चोरटी प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कलम ६६/१९२-अ अन्वये न्यायालयीन कारवाई होऊन रुपये ५ हजार रु. पर्यंत दंड होऊ शकतो. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन १२० दिवसांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. अशा बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीस विम्याचे संरक्षण ही नसते

मोटार वाहन कायद्याबाबत परिवहन मंत्रालय अत्यंत कडक होत असताना  बेकायदा बाइक टॅक्सींवर कारवाई का होत नाही?    अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे देखील बेकायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का?  होय!   कोणत्याही अज्ञात व्यक्तीला लिफ्ट देणे तुम्हाला महागात पडू शकते.  मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ६६ अंतर्गत असे करणे बेकायदेशीर आहे.  जर तुम्ही अनोळखी व्यक्तीला लिफ्ट दिली तर तुम्ही तुमचे खाजगी वाहन व्यावसायिक वापरासाठी वापरत असल्याचे समजते.  यासाठी कलम १९२ (अ) मध्ये दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

जर तुम्ही तुमच्या खाजगी वाहनात अज्ञात व्यक्तीला लिफ्ट देत असाल आणि वाहतूक पोलिसांनी तुम्हाला पकडले तर तुमच्यावर खाजगी वाहनाच्या परवान्याचा व्यावसायिक वापर केल्याचा आरोप होईल.  या अंतर्गत तुम्हाला २ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.  एवढेच नाही तर पुन्हा असे करताना आढळल्यास हा दंड दुप्पट म्हणजेच १० हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो.

आणि इथे तर दिवसाढवळ्या  जाहिरात  देऊन कंपनी ॲप द्वारे शेकडो तरुण पिढी या दुचाकीवर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत आहे,आणि कायदेशीर परवाना असलेल्या रिक्षा चालकांनी उपाशी मरावं म्हणून दुर्लक्षित केले जात आहे का ?

Post a Comment

Previous Post Next Post