पुणे पोलिसांच्या विशेष प्रयत्नामुळे यश , अधिक तपास सुरू आहे.
प्रेस मीडिया :
अनवरअली शेख :
पुणे : बाणेर येथील हाय स्ट्रीट परिसरातून पायी जाणाऱ्या 4 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते.अपहरण झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. सोशल मीडियावरुन देखील मुलाच्या तपासा बाबत पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. अखेर अपहरण झालेला मुलगा पुनावळे येथे सापडला असून तो सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्वर्णव उर्फ डुग्गू सतिश चव्हाण (वय-4) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वर्णव याचे एका अॅक्टिव्हा सारख्या दिसणाऱ्या गाडीवरुन अपहरण करण्यात आले होते. हा प्रकार बालेवाडी पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर मंगळवारी (दि.1) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडला होता. अखेर या मुलाची सुटका करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.स्वर्णव उर्फ डुग्गूचे वडिल सतिश चव्हाण हे डॉक्टर आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र , अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-1) गजानन टोणपे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे , गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांनी मुलाच्या शोध मोहिमेसाठी दिवसरात्र एक केले होते. दरम्यान, अद्यापही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अपहरण प्रकरणाच्या इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.