प्रेस मीडिया ऑनलाइन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
पुणे ,खडकी, देहूरोड छावणी भागात प्रवेश करताना वाहन प्रवेश शुल्क भरावा लागणार नाही शुल्क आकारणी बंद करण्याच्या संरक्षण मालमत्ता विभागाने सूचना दिल्या आहेत.
देशातील सर्व कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहन प्रवेश शुल्क आकारणी थांबविण्याची सूचना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डांना केली आहे.त्यामुळे पुणे, खडकी आणि देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहन प्रवेश शुल्क आकारणी बंद झाली आहे. प्रवेश शुल्क आकारणी बाबत वाहन चालक सातत्याने तक्रार करत होते. अखेर शुल्क आकारणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आता वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आली. लष्कर भागातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून २० ते ७० रुपयांचे प्रवेश शुल्क घेतले जात होते. मात्र, आता संरक्षण मालमत्ता विभागाने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे व्यावसायिक वाहनांची या कराच्या सापळ्यातून सुटका झाली आहे.
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क प्रेस मीडिया लाईव्ह*