परिपत्रके द्वारे सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना आदेश ग्रामविकास विभाग मंत्रालय यांचे २२ जानेवारी २०२० चे परिपत्रक.
प्रेस मीडिया ऑनलाईन
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रम पूर्वी *भारतीय संविधान उद्देशिकाचा सामूहिक वाचन करण्यात यावे.* असे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग मंत्रालय विभागाने दिनांक २२ जनवरी २०२२ रोजी परिपत्रका द्वारे आदेश जारी केले आहे.
या परिपत्रकात भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिन २६ जानेवारी १९५० पासून अमलात आले असून भारतीय संविधानाचे पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेतील मूल तत्त्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्या बरोबर घटनेतील न्याय ,स्वातंत्र्य ,समता व बंधुता हे मूळ तत्वे भारतीय नागरिकांच्या मनावर कोरली जावीत. या साठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे संविधानिक हक्क आणि कर्तव्य, स्वतंत्र, भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणारी असून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडवण्यात मदत होईल त्यामुळे दिनांक २६ जानेवारी २०२० पासून दरवर्षी होणारा प्रजासत्ताक ध्वजारोहन कार्यक्रमा पूर्वी भारताच्या संविधाना मधील उद्देशिका (सरनामा) याचे सामूहिक वाचन करण्यात यावे. सदर महाराष्ट्र शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या *WWW.Maharashtra.gov.in* या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून त्याच्या संकेतात २०२००१२०१३११०८७४२० असा आदेश असल्याचे शासनाचे उप सचिव पं. खं. जाधव यांनी परिपत्रकाद्वारे आदेश राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हा अधिकारी व सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना पारित केले आहे.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख : 9975071717