डॉ. तुषार निकाळजे या शिक्षकेतर- कर्मचाऱ्यास तीन शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित



प्रेस मीडिया ऑनलाइन :


पुणे :- टॉप रोबो लॅब प्रायव्हेट लिमिटेड,लुधियाना, पंजाब या संस्थेने डॉ. तुषार निकाळजे यांना टी पी एल शिक्षा २०२१ अवार्डने सन्मानित केले आहे. त्यांना "आउटस्टँडिंग अचीवमेंट इन द फील्ड आफ रिसर्च" करिता हा पुरस्कार प्रदान केला आहे.                                                                                         


तसेच विंग्स पब्लिकेशन्स, पुणे यांनी डॉ. तुषार निकाळजे यांच्या "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी "या दृष्टिहीन व्यक्तींकरिता लिहिलेल्या व प्रकाशित केलेल्या ब्रेल इंग्रजी पुस्तकास  "गोल्डन बुक" पुरस्काराने सन्मानित केले आहे .विद्यापीठांच्या निरनिराळ्या विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती या पुस्तकात दिली आहे.                                                              


नुकतेच दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी भारतातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालय ,शैक्षणिक संस्था यांना दृष्टिहीन विद्यार्थ्यांकरीता अभ्यासाचे साहित्य निर्मिती करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत.                                                                     


याचबरोबर राजस्थान येथील फोरएव्हर स्टार ऑफ इंडिया या संस्थेने डॉ. निकाळजे यांना "द रियल सुपरहिरो- प्रशासन २०२१" या पुरस्काराने सन्मानित केले आहे. फोरएव्हर स्टार ऑफ इंडिया, राजस्थान ही संस्था दरवर्षी ७० प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या व कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देत असते .त्यामध्ये सिनेमा, नाटक, लेखन, संगीत, सामाजिक कार्य  ,पत्रकारिता, चित्रकला, संशोधन, प्राध्यापक ,शिक्षक, प्रशासन इत्यादींचा समावेश आहे. डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेतर- कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी डॉ. तुषार निकाळजे यांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ०९ संस्थांनी शैक्षणिक व संशोधनात्मक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post