पुणे महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या ३४ गावातील ५८६ शिक्षकांच्या

शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर मोठ्या प्रमाणावर समायोजनाची बदल्या करण्यात येणार 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

जीलानी (मुन्ना) शेख :

 पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या ३४ गावातील ५८६ शिक्षकांच्या शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर मोठ्या प्रमाणावर समायोजनाची बदल्या करण्यात येणार आहेत.या ३४ गावांमधून जवळपास २५ ते ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये काम करणाऱ्या ५८६ शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक सत्राच्या मध्येच करत असल्यामुळे शिक्षक अस्वस्थ झाले आहेत. बहुसंख्य  विद्यार्थ्यांना अगोदरच  कोरोनामुळे  नुकसान झाले आहे. आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींचा विचार करता शिक्षकांच्या नियमित बदल्या या त्या वर्षाच्या शेवटच्या सत्रात करण्याबाबतचे नियोजन असते. मात्र या शैक्षणिक वर्षाच्या मध्येच होणाऱ्या बदल्या या निमानुसार शासनाच्या आरटीई कायद्याचा भंग करणाऱ्या आहेत. मात्र येथे समाविष्ट गावांतील शिक्षकांच्या शैक्षणिक सत्राच्या मध्येच बदल्या करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यामागची तत्परता का दाखवली जात आहे, या मागे नक्की गौडबंगाल काय आहे ?  असा प्रश्‍न पालक व शिक्षक विचारत आहेत.

संघाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी म्हटले आहे की, पुणे महापलिकेचे या ३४ समाविष्ट गांवातील शाळांमध्ये शिक्षक देण्याबाबत अद्याप कोणतेही नियोजन नसल्याचे चित्र आहे. या जागांवर शासनाच्या पोर्टलव्दारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यात जाहिरात देण्यापासून ते शिक्षक नेमणुकीपर्यंत सर्व बाबी पूर्ण कराव्या लागतील.यापूर्वी समाविष्ट गावे पुणे महापालिका हद्दीत आल्यावर तेथील शाळांत काम करणारे शिक्षक शाळांसह पुणे महापालिकेत समाविष्ट होत असत. मात्र २०१९मध्ये ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशात प्रशासनाने मनमानी पध्दतीने बदल करून अशा समाविष्ट गावातील शिक्षकांना पुणे मनपात येण्यास प्रतिबंध करण्यात आला.याच समाविष्ट गावात ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामपंचायती मधून काम करणारे कर्मचारी यांना मात्र पुणे मनपात समाविष्ट करणेबाबत कोणताही नियम  नाही. अशा पध्दतीने समाविष्ट गावांतील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांस वेगळा न्याय तर शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्याय का? असा प्रश्‍न संघटनेने केला आहे.

पंचवीस वर्षापासून निवड श्रेणी नाही

कृमगतीने धावणाऱ्या जिल्हा परिषदेला शिक्षक समायोजनाबाबत व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसणीस अश्‍वगती कोठून प्राप्त झाली हा मोठा प्रश्न पालक शिक्षकांना पडला आहे. गेल्या पंचवीस वर्षात पुणे जिल्ह्यातील एकाही शिक्षकाला निवड श्रेणी दिली नाही. आता मात्र चार दिवसांमध्ये ५८६ शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी विद्युत गती प्राप्त झाली आहे.

''पुणे महापालिकेत समाविष्ठ गावांचे हस्तांतर झाले आहे. महापालिका शाळांमधील रिक्त जागांसाठी समायोजन करण्यात येत आहे. झेडपीच्या शिक्षकांचा आर्थिक भार पडणार असल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.''

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद

Post a Comment

Previous Post Next Post