खळबळ जनक : प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकींचा बेकायदेशीरपणे वापर करणारी ॲप्स तात्काळ बंद करावीत; प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश

 ॲप द्वारे रिक्षावाल्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न परिवहन कार्यालयाने हाणून पाडला

प्रेस मीडिया ऑनलाईन :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख

प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकींचा  बेकायदेशीरपणे वापर करणारी ॲप्स तात्काळ बंद करावीत, असे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ,आरटीओ ने दिले आहेत. याबाबत कार्यालयाने पुणे सायबर पोलिसांना आदेश दिले आहेत.

दुचाकी टॅक्सी वाहतूक करणाऱ्या कंपनी,चालक यांना परवाना नाही  तर त्यांना प्रवासी वाहतूक करना बेकायदेशीर आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सायबर पोलिसांना पत्र पाठवून बेकायदेशीर वेबसाइट आणि ॲप सेवा तात्काळ बंद करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.

Uber, Amigo by Zoomcar, Rapido आणि Ola या कंपन्या प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकी (बाईक) वापरत आहेत. या कंपन्यांनी व्यावसायिक कारणांसाठी दुचाकी वापरण्याची परवानगी घेतली नाही. परिवहन विभागाने असा कोणताही परवाना जारी केलेला नाही. खाजगी कंपन्या त्यांच्या ॲप्सवर बुकिंग घेऊन दुचाकींद्वारे अवैध प्रवासी वाहतूक व्यवसाय करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या संदर्भात ‘उबर’ आणि ‘झूमकार’च्या अमिगो या प्रवासी वाहतूक कंपन्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. आदेशानंतर कंपन्यांनी थोडा वेळ मागितला आहे. महाराष्ट्र रिक्षा सेनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी परिवहन विभागाला पत्र लिहून प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकी वाहनांच्या अवैध वापराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तसेच, परिवहन विभागाने सायबर पोलिसांना या बाबत पत्र दिले होते.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

 प्रेस मीडिया :

Post a Comment

Previous Post Next Post