पुणे महानगर परिवहन बस मधून प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

प्रवासापूर्वी प्रवाशांना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा युनिव्हर्सल पास दाखवणं बंधनकारक ..


प्रेस मीडिया वृत्तसेवा

पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख


पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. या पुढे प्रवासापूर्वी प्रवाशांना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा युनिव्हर्सल पास दाखवणं बंधनकारक राहणार आहे. उद्यापासून सोमवार,  हा बदल लागू होणार आहे. 

नवीन नियमावलीचे पत्रक पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील सर्व पीएमपीएमएल बस स्थानकांना पाठविण्यात आले आहे. लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली जाणार आहे. वारंवार नियम मोडून विना लसीकरण प्रवास करणा-यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचे पीएमपीएमएलने म्हटले आहे

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार सरकारी कार्यालये, मॉल्स, थिएटर, नाट्यगृह, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पीएमपीएमएलने देखील नियमावलीत बदल करत प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारक केले आहेत. सोमवार पासून हे बदल लागू होतील.


*जाहिरातीसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post