कर्वेनगर मध्ये तरुणीची पोलिसांना चौकीतच मारहाण शिवी गाळ , इतर पोलिसांची बघ्याची भुमिका
पोलिस दिनाचा दिवशीची लाजिरवाणी घटणा ..
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
कर्वेनगर मध्ये शाहु काँलणी या ठिकाणी एक तरुणी आणि तीची आई दगड विटा आणि सळई घेऊन गाड्यांची तोडफोड करत होत्या त्या वेळी तेथील स्थानिक नागरिकांनी पोलीसांना संपर्क साधला व माहिती दिली पोलिसांनी ही तत्परता दाखवत घटना स्थळी दाखल झाले वारजे पोलिस ठाण्याचे बीट मार्शल घटणा स्थळी पोहचून तरुणी आणि तिच्या आईला कर्वेनगर मधील पोलिस चौकी येथे घटनेचा तपासा करण्यासाठी आणले असता त्या तरुणीने चौकी मधील दामिनी पथकातील महिला पोलिसावर अर्वाच्च ,अश्लील भाषेत शिवीगाळ केली, व महिला पोलिस वर मार हान करत पोलीसांना बेफाम शिवीगाळ करताना व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल होत आहे, तसेच झटापट करित खांद्यावरील मपो जाँईन्ट बेल्ट तोडण्यात आला आहे महिला पोलिसावर हल्ला करताना "माझा गुन्हा काय असे अपरोधितपणे विचारत होती, त्याच वेळी शेजारी उभे असणारे पोलिस बघ्याची भूमिका घेताना दिसत होते ती तरुणी नशेत होती की नाही या बाबत पोलिसांनी सांगण्यास नकार दिला आहे
इतक्यावरच ही तरुणी थांबली नसुन एका पोलिस काँन्टेबल वर्दीवर असताना हल्ला चढवत शर्टाची बटण तोडली आहे तसेच संबंधित ड्युटीवर असणारे पोलिस उपनिरीक्षकाला दुर ढकलले आहे या वरही पोलिस समजुन सांगत असताना तरुणी ऐकण्याचा मनस्थीतीत नसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगत आहेत पोलिस चौकीत तक्रारी प्रक्रिया चालु असताना ही तरुणी आणि महिला चौकीतुन काही घडले नसल्या सारखे आरामात घरी निघुन गेल्या आहेत या घटने बाबत वारजे पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे .
भल्या भल्यांना आडवे करणारे पोलिस महिला पुढे शरणागती का घेत होते तेच कळत नाही . या तरुणीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी वारजे मधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दबाव टाकत असल्याचे नाव न सांगण्याचा अटीवर एका पोलिस काँस्टेबलने सांगितले आहे. मृणाल किरण पाटील वय २१ वर्षे सजणा किरण पाटील वय ४५ अंदाजे वय आहेत असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत,