लॉन्ड्री चालकाच्या या प्रामाणिक पणा मुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : एका लॉन्ड्री चालकाने तब्बल लाखो रुपये किंमत असलेले दागिने ग्राहकाला परत केले आहे. लॉन्ड्री चालकाच्या या प्रामाणिक पणामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे.
सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असा सुमारे 6 लाख रुपयांचे दागिने परत करून अमराठी लॉन्ड्री चालकाने प्रमाणिकपणा दाखविला आहे. तर, व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया यांनी रविवारी कपडे इस्त्रीसाठी दिल्यानंतर मंगळवारी इस्त्री करताना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला इस्त्री केल्यानंतर त्यांना घरी नेऊन दिले. त्यावेळी ते सोन्याचे दागिने मिळत नसल्याने हतबल झाले होते. त्यांना कपड्यासह सोन्याचे दागिने दिल्यानंतर त्यांनी जीव भांड्यात पडला. असं शुभलक्ष्मी ड्रायक्लीनिकचे लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया (वय 28, रा. हांडेवाडी रोड, न्हावले नगर, पुणे) याने सांगितलं.
राजमल कनोजिया यांनी सांगितलं की, ”6 लाख रुपयांचे दागिने घेऊन माझा संसार सुखाचा होणार नाही आणि मला समाधान मिळणार नाही. प्रामाणिकपणा ही आयुष्याची मोठी कमाई आहे. मागिल ३ वर्षांपासून लॉन्ड्री व्यवसाय करीत असून, परिसरातील सोसायट्यातून कपडे आणून इस्त्री आणि ड्रायक्लीन करून देत आहे. आतापर्यंत कोणाच्या पैशालाही धक्का लावला नाही. कष्टाची कमाईच समाधान देते.”