पुणे : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या वसाहतींची मोठया प्रमाणात दुरावस्था

काहीही सुविधा नसताना घरभाडे वाढ ..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  जीलानी (मुन्ना ) शेख

पुणे : पुणे महानगरपालिके कडून आपल्याच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी  बांधलेल्या वसाहतींची मोठया प्रमाणात दुरावस्था झालेली असून मोडकळीस आलेल्या या धोकादायक घरां मध्ये अनारोग्याच्या सामना करत या वसाहतींमधील कर्मचारी दिवस काढत आहेत.असे असतानाच; महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याचे सांगत महानगरपालिका प्रशासना कडून कर्मचाऱ्यांचे  घरभाडे प्रंचड प्रमाणात वाढविले आहे.त्या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून तातडीनं ही भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.तसेच महापालिका आयुक्तांनी या घरांची आधी पाहणी करावी आणि वाढविलेले भाडे कितपत योग्य आहे याचा विचार करावा असे पत्रच घाटे यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

या बाबत माहिती देताना घाटे म्हणाले की, महापालिकेच्या अनेक वसाहतींमध्ये पालिकेचे स्वच्छता सेवक राहतात, एका बाजूला त्यांच्यावर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असताना दुसऱ्या बाजूला त्यांना राहण्यासाठी पालिकेने दिलेल्या वसाहती 50 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यातच, त्या मोडकळीस आलेल्या असून जीव मुठीत घेऊन हे कामगार त्या ठिकाणी राहत आहेत. असे असतानाही पालिका त्यांना कोणत्याही आवश्‍यक सुविधा पुरवत नाही.

मात्र, त्याच वेळी 2014 मध्ये महापालिकेच्या ऑडीट विभागाने या मनपा चाळींचे भाडे तडका-फटकी वाढविले, त्यानंतर आता पुन्हा चाळ विभागाने सातव्या वेतन आयोगाचे कारण देत या घरांचे भाडे 10 ते 14 हजारांवर नेले आहे. ही या कामगारांवर अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे या कामगारांमध्ये असंतोषाची भावना असून तातडीनं ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली असल्याचे घाटे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post