रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
प्रेस मीडिया ऑनलाईन
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पुणे : पुणे शहरातील शिवाजी नगर या रेल्वे स्थानकाचे नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक करावे अशी मागणी मावळ तालुक्यातील शिवभक्त तरुणांनी शिववंदना ग्रुप महाराष्ट्र च्या वतीने रेल्वे मंडल प्रबंदक,श्रीमती रेणू शहा पुणे व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना पत्रकाद्वारे निवेदन दिले आहे.
पुणे शहरला ऐतिहासिक महत्त्व असून छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाबाई यांनी पुणे शहराला नावारूपाला आणले,पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर समजले जाते,जगभरातून येथे लाखो लोक फिरायला,शिक्षणाला,तसेच व्यवसाय नोकरीच्या माध्यमातून येत असतात.आशा या पुण्यनगरी मध्ये शिवाजी नगर हे रेल्वे स्थानक असून यावर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे,त्यामुळे शिवभक्तांनमधे नाराजी दिसून येते, रेल्वे म्हणजे केंद्राचा विषय आहे म्हणून बरेच जण ईच्छा असून काही करू शकत नव्हते,यातूनच शिववंदना या
ग्रुप ने थेट रेल्वे अधिकारी,जिल्हा अधिकारी कार्यालय गाठले. तसेच महाराष्ट्र राज्य रेल्वेमंत्री, व पालकमंत्री पुणे व मावळ येथील खासदार साहेब ,आमदार साहेब, तसेच पुणे नगरपालिकेला ही निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे पदाधिकारी दिनेश ठोंबरे व तुषार वहिले यांनी सांगितले. दिनांक १९ फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती पर्यंत यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा व शिव प्रेमींच्या भावनांचा आदर ठेवावा अशी मागणी करण्यात येत आहे.निवेदनावर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश ठोंबरे, मावळ तालुका अध्यक्ष तुषार वहिले,पदाधिकारी सोपान सावंत,गणेश काटकर,निलेश कडू,प्रा.महादेव वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.