संरक्षण मंत्रालयाच्या आदेशालाच दाखवली केराची टोपली

  पुणे कॅम्प ते कोंढवा रस्त्यावर छावणी भागात वाहन प्रवेश शुल्कची वसुली


प्रेस मीडिया ऑनलाईन

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख : 

नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर संरक्षण मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्डांद्वारे वाहन प्रवेश शुल्क वसूल करण्यास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुणे कँप ते कोंढवा जाणाऱ्या दिशेला स्थित असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नाक्यावर  वाहन प्रवेश कर आकारला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे .संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानंतर ही वसुली सुरूच असल्याचे समोर आलं आहे 

पुणे ,खडकी, देहूरोड छावणी भागात प्रवेश करताना वाहन प्रवेश शुल्क भरावा लागणार नाही शुल्क आकारणी बंद करण्याच्या संरक्षण मालमत्ता विभागाने  सूचना दिल्या होत्या अश्या अनेक बातम्या मागील आठवड्यात प्रकाशित झाल्या होत्या, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती.

परंतु या ठिकाणी पुणे ते कोंढवा जाणाऱ्या रस्त्यावर छावणी हद्दीमध्ये प्रवेश करण्याचे शुल्क आकारले जात आहे ते पाहून प्रेस मीडियाचे प्रतिनिधी यांनी स्वतः आढावा घेतला असता त्या वेळी तेथील नागरिकांनी व प्रवासी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ही माहिती दिली की खडकी व देहूरोड छावणी हद्दीत प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुक्ल लागत नाही परंतु पुण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने वेगळे निर्देश दिले आहेत का ?? असा प्रश्न निर्माण झाला आहे,


देशातील सर्व कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहन प्रवेश शुल्क आकारणी थांबविण्याची सूचना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डांना केली होती.त्यामुळे खडकी आणि देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहन प्रवेश शुल्क आकारणी बंद झाली आहे. अखेर शुल्क आकारणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सुद्धा वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आलेली नाही म्हणून संभ्रम निर्माण होत आहे लष्कर भागातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून ६०.रुपयांचे प्रवेश शुल्क घेतले जात आहे. मात्र, आता संरक्षण मालमत्ता विभागाने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या असून अमलबजावणी होत नाही.त्यामुळे व्यावसायिक वाहन चालकांनी तीर्वनाराजी व्यक्त केली व या कराच्या सापळ्या पासून सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे,



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क : प्रेस मीडिया लाईव्ह*

Post a Comment

Previous Post Next Post