या वेश्या व्यवसायावर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला
प्रेस मीडिया ऑनलाइन :
अनवरअली शेख :
पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत.आता तर पिंपरी चिंचवड मधील वाकड भागातील स्पा सेंटरमध्ये चक्क वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली असून या वेश्या व्यवसायावर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. येथून एकूण सात महिलांची सुटका करण्यात आली असून शुभांकर महेश जवाजीवार तसेच रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.
स्पा सेंटरमध्ये सुरु होता व्येश्या व्यवसाय
मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील वाकड भागातील स्पा सेंटरमध्ये चक्क वेश्या व्यवसाय सुरु होता. याची माहिती पिंपरी चिंचवडमधील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर डांगे चौकातील ईलिमेंट्स द फॅमिली स्पा या स्पा सेंटरवर पिंपरी चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली. स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. यामध्ये सात महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.
दोन आरोपींना अटक, सात महिलांची सूुटका
तर शुभांकर महेश जवाजीवार, रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन आरोपींनी सात महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. पोलिसांनी सात महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली असून त्यांना त्यांच्या घरी तसेच वेगवेगळ्या समाजिक संस्थांकडे सोपवले जाणार आहे.