प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : आज दिनांक 28 जून 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉल मालधक्का चौक येथे पुणे शहरातील प्रसिद्ध पत्रकार हलिमा कुरेशी , बीबीसी मराठी ,आयबीएन सेव्हन , लोकमत न्यूज चॅनल , मोहिनी मोहिते दैनिक सकाळ , शब्बीर मुजाहिद हमनवा या सर्वांचा मजलिसच्या वतीने सन्मानित करण्यात आले. मजहर खान सज्जग नागरीक टाइम्स, अॅडव्होकेट रशीद सिद्दीकी , सिनियर रिपोर्टर, मुजम्मिल शेख , महाराष्ट्र टाईम्स यांचा जुन्नर नगरपरिषदेचे नगरसेवक जमीर खान कागदी आणि डॅनियल लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अझीम गुडाकुवाला यांनी केले आणि ऑल इंडिया मजलीसचे या शहरात काय कार्य असावे, याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत माहिती घेण्यात आली असून पूना शहरातील हज हाऊसमधून सर्व लोकांना संपूर्ण माहिती देण्यात आली असून कोंढव्यात जे काम होत नाही त्याचीही माहिती सभापती जमीर कागदी यांनी मजलिसमधील लोकांना केलेल्या भाषणात दिली. त्यांच्या कामाची मोजदाद करून हिंमत दिली, कार्यक्रमात शाहीद शेख, कार्याध्यक्ष निनाद धेंडे, मुबीन खान उपाध्यक्ष, साबीर शेख सरचिटणीस, सुमय्या पठाण उपाध्यक्ष महिला शाखा, अमरीन पालकर, अल्ताफ शेख, माजिद शेख, मन्सूर शेख, फयाज कुरेशी आदी उपस्थित होते. , शाहिद युनूस , फयाज खान, रोशनी शेख, डॉ जबीन मोमीन, गुलशन आपा, हे सर्व उपस्थीत होते.