परिवर्तन घडवण्याची ईच्छा शक्ती प्राप्त केल्याशिवाय जीवनात आपण काहीच सार्थ करू शकत नाही...
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख :
परिवर्तन घडवण्याची ईच्छा शक्ती प्राप्त केल्या शिवाय जीवनात आपण काहीच सार्थ करू शकत नाही,आणि इच्छा शक्ती प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहावा लागतो आणि स्वप्नात पाहिलेले साध्य करण्या साठी जिद्द,धाडस,कष्ट,प्रयत्न,आणि प्रयत्नातून यशाचं शिखर गाठण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुण अंगी असणारी व्यक्ती महत्व निर्माण होत.
असाचं एक आदर्श प्रवास आहे धारावी कट्टा सिनेमा मधील सुलेमान भाई ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मोम्मद नबी शेख यांची, हिंदी चित्रपट धारावी कट्टा प्रक्यात डायरेक्टर व राईटर अल्ताफ दादासाहेब अल्ताफ दादासाहेब शेख हे गाजलेले डायरेक्टर आणि राइटर आहेत,त्यांच्या या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता नबी शेख हा मुळ तामिळनाडूचा रहिवासीआहे परंतु महाराष्ट्रात पुण्यात देहूरोड येथील एका झोपडपट्टी वास्तव्यास आलेल्या अभिनयाची आवड असणाऱ्या मुलाने आपल्या आयुष्यात एक स्वप्न पाहिलं होतं की मला अभिनेता व्हायचं परंतु घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यात मुख्य म्हणजे शिक्षण ही घेता अल नाही कमी वयातच कामाला जुपला एकीकडे अभिनयाची चुणूक आणि दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असलेला मोहम्मदनबी सुलेमान शेख आज हिंदी चित्रपट धारावी कट्टा या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिकेत दिसणार आहे,
सुलेमानभाई धारावी कट्टा सिनेमा मधे एक हफ्ता वसूली करणारा मुंबईतला भाई आहे अशी ती भूमिका आहे, या आधी मो.नबी ने कार्टून या मराठी चित्रपटात ही असिस्टंट फायटर ची भूमिका साकारली होती त्या नंतर राजस्थानी चित्रपट ठकुराईन,भोजपुरी कब्बो साचं कब्बो,मारवाडी चित्रपट बाबुल थारी लाडली या चित्रपटात प्रमुख भूमिका साकरल्या आहेत,
आत्ता पर्यंत प्रवास करत हिंदी चित्रपट धारावी कट्टा या अल्ताफ दादासाहेब यांच्या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता नबी शेख. याची एक आदर्श प्रवासाची कथा देहूरोड येथील इंद्रानगर झोपडपट्टी ते धारावी कट्टा सिनेमा अभिनयाचा एक प्रवास मी या ठिकाणी धारावी कट्टा सिनेमाची वाट पाहणाऱ्या दर्षकांसाठी परद्या पलीकडची एक खरी कथा साकारली आहे.