आता होणार अमलबजावणी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
दुकानांवरील नाव फलक पाट्यांबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यापुढे राज्यातील सर्व दुकानांवर फक्त मराठी पाट्या झळकणार आहेत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानांवरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.
मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष / महनीय महिला किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला आहे.
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील- मराठी भाषा मंत्री @Subhash_Desai यांची माहिती
सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता, मात्र याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव आणि मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असं काहीसं चित्र दिसत होतं. आजच्या निर्णयाने इतर भाषेप्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.