पुणे- पिंपरी चिंचवड,पुणे महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी .
प्रेस मीडिया ऑनलाइन :
अनवरअली शेख :
पुणे : पुणे- पिंपरी चिंचवड,पुणे महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे कॉन्सिल हॉलच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती.
हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर कोराना नियमांचे पालन करुन मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र,कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
दुकाने, हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांच्यावर गेल्यास कडक निर्बंध लावण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी कोरोना दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणं आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलं आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी आहे. प्रत्येक 15 दिवसांनी मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करणं बंधनकारक आहे.
पुण्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आजपर्यंत बाधितांची संख्या तब्बल 5 लाख 26 हजार 35 वर गेलीय. सध्या पुण्यात 14 हजार 890 सक्रिय कोरोना बाधित आहेत. त्यात रविवारी म्हणे 18 हजार 12 जणांची चाचणी करण्यात आली. त्यात तब्बल 4 हजार 29 नवे बाधित सापडले. दिवसभरात तिघांचा मृत्यूही झाला.
आठवड्यात दहा जणांचा मृत्यू झालाय, तर काल कोरोनातून 688 जण बरे झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, नागरिकांनी काळजी करण्याऐवजी स्वतःची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.