बेकायदेशीर सावकारी प्रकरणात दोघांना जामीन..



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

अनवरअली शेख : 

पुणे - साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर 5 कोटी दहा लाख रुपये परत केल्यानंतरही आणखी पावणे पाच कोटी रुपये मागत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही.निमसे यांनी जामीन मंजुर केला आहे.रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय 37, रा. औंध) आणि अनिकेत रमेश हजारे (वय 38, रा. दापोडी) अशी त्या दोघांची नावे आहेत. हजारे याच्या वतीने ऍड. रविशंकर बिभिषण ठोंबरे, ऍड. श्रेया सावंत, ऍड. चैतन्य जोशी, ऍड. सागर पवार आणि संजय वैराळे यांनी काम पाहिले. हा प्रकार ऑगस्ट 2015 ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला. याबाबत बालेवाडी येथील 35 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी वाळके याच्याकडून साडेतीन कोटी रुपये घेतले. याबदल्यात हजारे याच्या वेगवेगळ्या खात्यात फिर्यादींनी 3 कोटी 2 लाख 27 हजार रुपये भरले. रोखीने 2 कोटी 7 लाख 73 हजार रुपये असे एकुण 5 कोटी 10 लाख रुपये परत दिले आहेत. असे असतानाही फिर्यादींच्या गाडीचे आरसी बुक, धनादेश जबरदस्तीने घेण्यात आले.

बळजबरीने प्रॉमिसरी नोट लिहून घेण्यात आली. शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादींकडून 4 कोटी 75 लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दिलेल्या फिर्यादीनुसार खंडणी आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post