चोरीचा आरोप केल्याने अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 पुण्यात लाजवणारी घटना पुणे हादरलं ..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

अनवरअली शेख :

पुण्यात एक लाजवणारी घटनेने  पुणे हादरलं , घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मालकिणीने चप्पल आणि पर्स चोरल्याचा आरोप केल्याने दुखावलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  मोहम्मदवाडी कोंढवा येथील कृष्णानगरमध्ये ही घटना घडली. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी घरमालक  महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पायल बाबू चव्हाण वय १७ असे आत्महत्या केलेल्या अल्प वयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पल्लवी रितेश अग्रवाल वय ४० या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल मागील काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी काम करत होती. पल्लवी यांनी पायल हिच्यावर पर्स आणि चप्पल चोरीचा आळ घेतला होता. तसेच तिला वारंवार त्रास देखील दिला होता. चोरीचा आळ आणि होणारा त्रास सहन न झाल्याने पायलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


 कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क : 

 पुणे जिल्हा प्रतिनिधी 9975071717

Post a Comment

Previous Post Next Post