वाहन चालकाचा तुटवडा असल्याने पोलिसांची मोठी दमछाक होताना दिसत आहे.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अनवरअली शेख :
पिंपरी – शहारातील वाढत चाललेली गुन्हेगारी पोलिसांसाठी फार मोठी डोके दुखी ठरत आहे तर दुसरीकडं अपुऱ्या सुविधांमुळे पोलिसाना काम करताना अडचणी होत असल्याचे दिसत आहेत याला कारण अपुऱ्या मनुष्यबळ ,पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच वाहन चालवण्यासाठी वाहन चालकाचा तुटवडा असल्याने पोलिसांची मोठी दमछाक होताना दिसत आहे.
शहरात घरफोडी , चोरी, जबर चोरी या सारख्या घटनांच्या तपासासाठी जाताना पोलिसांना मोठी अडचण जाणवत आहे. वाहनांसाठी वाहनचालक नसल्याने अनेकदा वेळेत घटनेच्या ठिकाणी पोहचता येत नाही. बऱ्याचदा आरोपीला पकडायला जायचे आहे , वाहन आहे पण वाहन चालक मिळेल का...? अशी विचारणा पोलीस अधिकाऱ्यांच्या कडून केली जाते . पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलाची विभागणी करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती केली. त्या मुळे तिथल्या जुन्या, बिघाड झालेल्या गाड्या इकडे आल्या. त्या मुळे साहजिकच सुरुवाती पासून पोलीस आयुक्तालयांच्या वाहनाचा प्रवासच ढकल गाडी सारखा झाला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात 720 कर्मचाऱ्यांसाठी भरती झाली मात्र या भरती मध्ये वाहन चालकांच्या पदाचा समावेश नव्हता. वाहन चालक पदाची भरती करावे याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाने वरिष्ठ पातळीवर सादर केलेला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळलेली नाही.
शहर पोलीस दलातील वाहनांची सद्यस्थिती
उपलब्ध वाहन चालक -98
आवश्यक वाहनचालक -277
वाहनचालकांची रिक्त पदे – 179
किती वाहनचालकांचा प्रस्ताव – 338