पिंपरी-चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामांना शास्तीकर वगळून करआकारणी करावी

  महापौर उषा माई ढोरे यांची राज्य शासनाकडे मागणी.


प्रेस मीडिया ऑनलाईन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी-चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामांना शास्तीकर वगळून करआकारणी करावी अशी मागणी महापौर उषा  माई ढोरे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या की, सन २०१७ मध्ये भाजपा महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १ हजार चौरस फुट अनाधिकृत बांधकामावरील संपूर्ण शास्तीकर माफ केला आहे त्याचप्रमाणे १००१ ते २००० चौरस फुट अनाधिकृत बांधकामावर ०.५ शास्तीकर केला आहे. तसेच महानगरपालिकेने संपूर्ण शास्तीकर माफ करण्याबाबत महापालिका सभेचा ठराव शासनाकडे पाठविलेला आहे. त्याची अंमलबजावणी न करता शासनाने अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारीसाठी जाचक अटी नागरिकांच्या माथी मारल्या आहेत. प्रथम नागरिकांना गुंठेवारी सोयीस्कर होण्यासाठी सदर गुंठेवारीचे नियमात शिथिलता आणण्यात यावी.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सन २००५ मध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना अनाधिकृत बांधकामावर शास्तीकराचे ओझे सन २००८ मध्ये लादले गेले. त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचीच सत्ता होती. नागरिकांनी जशी घरे बांधलेली आहे तशीच बांधलेली घरे गुंठेवारीने नियमित करावीत अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे शास्तीकर वगळून भरणा घेण्याऐवजी महापालिका सभा ठराव याप्रमाणे सरसकट शास्तीकर माफ करून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महापौरांनी शासनाकडे केली आहे.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : 

पठाण एम एस 94232 49331*

Post a Comment

Previous Post Next Post