पक्षांतर्गत नाराजीचा सुर ;
जुन्या कार्यकर्त्यांना डावलून आया रामांना पद .
प्रेस मीडिया ऑनलाईन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
देहूरोड दि ११ आज महाराष्ट्र नव निर्माण सेना देहूरोड येथील मनसे सैनिकांनी मवाळ कार्यकारणी बरखास्त करा व पक्षाचे प्रोटोकॉल पाळले जावे अशी मागणी करत एड. रवींद्र गारूडकर पुणे जिल्हा मनसे अध्यक्ष यांना पत्र सादर केले आहे .
पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना पदे दिली जातात म्हणून नाराजी व्यक्त केली आहे पक्ष वाढीसाठी ज्यांचे काहीच योगदान नाही अशांची वर्णी लावली जाते म्हणून जुने कार्यकर्ते नाराज होतात आणि तालुक्यात पक्ष वाढत नाही असे प्रसिद्धीत पत्रकात नमूद केले आहे.
पत्रकावर सुशिल कुमार पायगुडे,रामदास येवले,भरत बोडके,मोझेस दास,जॉर्ज दास,मलिक शेख,निरंजन चव्हान, मदन बबन शिंदे,संदीप पोटफोडे,विजय भानुसघरे,,अनिल कडू,योगेश हुळवले, सुनील सावळे ,लक्ष्मण बाळू पिंपळे ,आकाश पारखी, इत्यादी मनसे सैनिकांनी सह्या केल्या आहेत .