प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
शहरात मोकळ्या प्लॉट, भूखंडावर कचरा टाकल्यास व्यक्ती व छोट्या अस्थापनेवर ५ हजार रुपये दंड तर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.शहरातील सर्व मोकळ्या प्लॉट्स, भूखंडामध्ये असलेली अस्वच्छता सर्व भूखंड धारकांनी तातडीने स्वच्छ करुन घेण्याची कार्यवाही करावी. यापुढे कोणत्याही मोकळ्या प्लॉट्स, भूखंडामध्ये कचरा टाकताना व्यक्ती आढळून आल्यास त्या व्यक्ती विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
महापालिके मार्फेत शहरामध्ये स्वच्छता राखण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात येते तसेच अस्वच्छता पसरविणा-या व्यक्ती, आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.त्याच बरोबर मोकळ्या भूखंडामध्ये अस्वच्छता होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या जागेच्या मालकाची असल्याने मोकळ्या प्लॉटमध्ये अस्वच्छा झाल्याचे दिसून आल्यास संबंधित मालकावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला