देहूरोड भागातून चंदनाची झाडांची चोरी

 देहुरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध  गुन्हा दाखल ..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

देहुरोड दि. ७ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून  चंदनाची झाडे चोरी झाल्याचे आढळून आले आहे. तसेच,  ऑर्डनन्स फॅक्टरीतून ही  चंदन चोरीचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून पाच चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहेत. यात पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, आयुध निर्माण फॅक्टरीत अज्ञात चोरट्यांनी घुसून चंदनाची झाडे चोरीचा प्रयत्न केला आहे. 

  राहुल वसंत भोसले वय ४५ रा. मामुर्डी, देहुरोड यांनी व निखिल देविदास दंडारे वय ३१, रा. ऑडनस फॅक्टरी यांनी फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस 94232 49331

Post a Comment

Previous Post Next Post