महानगरपालिका निवडणुकी बाबत राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था..
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेत झाली असती तर आज आचारसंहिता लागू झालेली असती. परंतु, कोरोनाची तिसरी लाट,ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न पुढे आला. आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत अशी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेतली. त्याचा तिढा सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट आली. जानेवारी महिना संपत आला तरी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडाही जाहीर झाला नाही. महापालिकेची निवडणूक १३ मार्च च्या अगोदर होईल का? प्रशासक नेमणार? सहा महिने निवडणुका पुढे जाणार याबाबतचे कोणतेही चित्र स्पष्ट होत नाही.
त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकही शांत झाले असून सर्व कार्यक्रम,हालचालींना विराम लागला आहे . मतदारांसाठीचे देवदर्शन, सहली, पार्ट्या थांबल्या असून,इच्छुकांच्या जोरदार तयारीला देखील विराम मिळालेला पाहायला मिळत आहे. हवेतील गारव्याबरोबर शहरातील राजकीय वातावरणही थंडगार झालेले चीत्र दिसत आहे.
महापालिकेची निवडणूक १३ मार्चच्या अगोदर होणार का ?
प्रभाग रचना कधी जाहीर होईल ? प्रशासक नेमणार ?
सहा महिने निवडणुका पुढे जाणार?
ओबीसी आरक्षणासह की आरक्षणाविना निवडणूक होईल ?
आचारसंहिता कधीपासून होईल ?
याकडे विद्यमान नगरसेवकांसह सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे
परंतु याबाबत कोणतेही चित्र तुर्तास स्पष्ट होतना दिसत नाही.
त्यामुळे सुरुवातीला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबिवले जाणारे वेगवेगळे उपक्रम, देवदर्शन, सहली,पार्ट्या,सर्वच थांबले आहे. निवडणूक आणखी काही महिने लांबली तर खर्च कशाला करायचा हा विचार करुन विद्यमानांसह इच्छुकांनी सर्व कार्यक्रमंना विराम दिले आहे. असे दृश्य शहरात पाहायला मिळत आहे. एकूणच महापालिका निवडणुकीबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.