प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड : पठाण एम एस :
पिंपरी चिंचवड : शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे, त्यांचे पती शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्यासह दहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला .
कै. बबनराव कृष्णाजी चिंचवडे, कै. पोपटराव कृष्णाजी चिंचवडे, कृष्णाबाई जयवंत काटे, जमिनीचे सध्याचे लाभार्थी सोमनाथ बबन चिंचवडे, संतोष बबन चिंचवडे, उमा दिलीप शिवळे, सीमा गोविंद जाधव, हेमा शिवाजी चौधरी, गजानन पोपटराव चिंचवडे, अश्विनी गजानन चिंचवडे, तसेच त्यांना मदत करणारे व्यक्ती व संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकुंतला बाळू चिंचवडे (वय 71, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी 25 जानेवारी 2022 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सन 1971 ते सन 2018 या कालावधीत वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडला.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बबनराव चिंचवडे यांची मावस बहीण कृष्णाबाई काटे व फिर्यादी यांचे सासरे कृष्णाजी चिंचवडे यांच्यात सन 1971 साली बेकायदेशीर खरेदीखत झाले . दरम्यान, फिर्यादी शकुंतला चिंचवडे यांचे दीर पोपटराव चिंचवडे आणि बबनराव चिंचवडे यांनी फिर्यादी व फिर्यादी यांच्या मुलांचा त्यांच्या जमिनीवरील कायदेशीर हक्क डावलण्यासाठी व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांना कोणतीही माहिती दिली नाही.
साल 1971 साली झालेल्या बेकायदेशीर खरेदीखताची शासकीय अधिका-यांच्या मदतीने 1993 साली नोंद केली. त्यात फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच वारसांची देखील चुकीची माहिती शासन दप्तरी नोंद करून त्यांच्या वाटणीस येणारी 36 गुंठे जमीन फिर्यादी यांच्या कुटुंबियांना न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील तपास करीत आहेत.