आरोग्य शिबिराचे आयोजनात रुपीनगर परिसरातील नागरिकांनी घेतला लाभ.
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पिंपरी चिंचवड :
ज्येष्ठ पत्रकार एम डी . शुक्रुल्ला :
स्पंदन हॉस्पिटल निगडी यांच्यावतीने रुपीनगर येथे प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्तआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रुपीनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचा आरंभास महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व भारतीय संविधान उद्देशिका चा सामूहिक वाचन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रसिद्ध उद्योगपती माननीय अक़ील जी मुजावर यांच्या हस्ते झेंडा फडकावण्यात आला. त्यावेळी डॉक्टर अभिनव खरे , रुपीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश गुमाने सह स्टाफ उपस्थित होते , तसेच रिटायर पोलीस निरीक्षक गुलाम मोहम्मद शेख , वाजिद कमली , रुपीनगरचे मौलाना एजाज मुल्ला , हाफिज इम्रान , अमीन शेख , सय्यद शेख नूर , वसीम तांबोळी , समीर भाई , डॉक्टर मशमूम , डॉक्टर अश्विनी , हिजामा कपिंग थेरपिस्ट एम डी शुकरुल्लाह , प्रियांश उमाकांत पटेल , भानुदास वैराट , मनोज मोरे व हॉस्पिटलचा सर्व स्टाफ व उपस्थित होता .
यावेळी आरोग्य शिबीर चा रुपीनगर रहिवाशी यांनी पुरेपूर लाभ घेतला डॉक्टर अभिनव खरे व मा . अकील मुजावर यांच्या हस्ते गरजू गोर गरीबांना फळे व लागणाऱ्या आवश्यक वस्तू वाटप करण्यात आले.आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे संपादन हॉस्पिटलच्या वतीने आभार प्रकट करण्यात आले.