आता शास्तीकर न भरता मूळ कर भरल्याची पावती जोडता येणार

  नागरिकांना मोठा दिलासा जास्तीत-जास्त नागरिकांनी अर्ज करून अवैध बांधकामे नियमित करण्याचे आवाहन.

प्रेस मीडिया ऑनलाइन :

पुणे जिल्हा प्रतिनिधी: अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बांधकामे नियमितकरणासाठी अर्ज करणे सोपे आणि सुलभ झाले आहे. व शास्तीकराची आट ही रद्द या निर्णयामुळे शहरातील अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणावर नियमित होतील. जास्तीत-जास्त नागरिकांनी अर्ज करून अवैध बांधकामे नियमित करावीत, असे आवाहन 

आयुक्तांनी शास्तीकराचा भरणा करून करसंकलन विभागाचा ना-हरकत (एनओसी) दाखला घेण्याऐवजी शास्तीकर न भरता मार्च २०२१ अखेर मूळ कराचा भरणा केल्याची पावती अर्जासोबत देण्याची मुभा दिली, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शास्तीकरामुळे काम रखडणार नाही. अर्ज करणे सोपे होणार आहे. अनेकांचे अर्ज येतील आणि घरे नियमित होतील,  शास्तीकर न भरता मूळ कर भरल्याची पावती जोडण्याचा निर्णय घेऊन  सरकारने शास्तीकर रद्द करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले 

राज्य सरकारने राज्यातील महापालिका हद्दीतील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमात सुधारणा केली आहे. त्याबाबतचा आदेश १८ऑक्टोबर २०२१ रोजी जारी केला आहे. त्यानुसार, पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध मालमत्ताधारकांना अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले होते.

पूर्वी शास्तीकराचा भरणा करून करसंकलन विभागाचा ना-हरकत (एनओसी) दाखला घेण्याची अट होती. आता शास्तीकर न भरता मूळ कर भरल्याची पावती जोडता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारने शास्तीकर रद्द करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.


*जाहिराती साठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post