दूरसंचार कंपन्यांच्या खेळीला ट्रायचा चाप

 ग्राहकांची लूट थांबणार प्रीपेड ग्राहकांसाठी 30 दिवसांची व्हॅलिडिटी

 आता होणार पूर्ण ३० दिवसांचा रिचार्ज


प्रेस मीडिया ऑनलाईन :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

  ग्राहकांची सेवेच्या नावाखाली लूट करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना Telecom Company भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने TRAI चांगलाच दणका दिला आहे . या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला ट्रायने चाप लागावला आहे . प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांची लूट थांबविण्यासाठी ट्राय वेळोवेळी निर्णय घेत असते .ग्राहकांचे हितसंरक्षण महत्त्वाचे ग्राहकांच्या आलेल्या प्रतिक्रियेनंतर ट्रायने २८ दिवसांच्या वैधतेऐवजी ३० दिवसांच्या वैधतेचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले . दूरसंचार कंपन्यांनी दिवसांची वैधतेबाबत लपवाछपवी न करण्याचे निर्देश ट्रायने  सादर केले आहेत . ग्राहकांचे हितसंरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे ट्रायने सांगितले आहे . 

तसेच दूरसंचार कंपन्यांच्या लूट धोरणापासून ग्राहकांचे हित संरक्षण करते ग्राहकांच्या आड-अडचणी सोडविण्याचे आणि दूरसंचार कंपन्यांविरोधातील तक्रारीचा निपटारा करण्याचे महत्वाचे काम ट्राय करते . टेलिकॉम ऑपरेटर्सना  Telecom Companies  प्रीपेड ग्राहकांसाठी ३० दिवसांची वैधता असलेले रिचार्ज प्लॅन्स द्यावे लागतील , अशी स्पष्ट भूमिका टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने TRAI   ने गुरुवारी २७/०१/२०२२ रोजी घेतली आहे .


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : 

पठाण एम एस 94232 49331

Post a Comment

Previous Post Next Post