प्रसिद्ध उद्योजक मा. नजीब सैदयांना मानवरत्न हा मनाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
प्रेस मीडिया :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पुणे मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने ग़ोर गरीबांसाठी सदैव प्रयत्नशील राहणारे असे व्यक्तिमत्व , आणि मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणारे गरिबांचे कैवारी समजले जाणारे, अहोरात्र दिवस गरिबांच्या हक्कासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक मा. नजीब सैदयांना मानवरत्न हा मनाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष *डॉ. सतीश केदारी* यांच्या हस्ते नजीब सैद यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नजीब सैद हे प्रसिद्ध उद्योजक असून सामाजिक क्षेत्रा मध्ये गोरगरिबांना आधार देणारे गरीबांचे वाली व सर्व सामान्यांना सामाजिक न्याय मिळवून देणारे मानवतावादी नेता अशी त्यांची ख्याती आहे. गोरगरीब गरजू छोटे - मोठे उद्योग व्यवसायीकांना त्यांनी मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबन करण्याचे महत्वपुर्ण कार्य केलेले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रभर ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आसतात. त्यांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना मानवरत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित ,गौरविण्यात आले आले.
या वेळी संघटनेचे पदाधिकारी *मा. प्रभाकर निकम, मा. हेमंत निवंगुणे, मा. कपिल राक्षे, डॉ. किरण घोलप, रुद्र क्षीरसागर* आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
मानव रत्न पुरस्काराने सन्मानित नजीब सैद यांच्यावर सर्व क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.v त्यांच्या कार्याचे ही नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.