प्रेस मीडिया ऑनलाईन :
पिंपरी चिंचवड मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस :
विजय जेठालाल भानुशाली वय ४०, रा. पिंपरीगाव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला. घरातून दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी उघडकीस आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
नितीन शिवाजी घारे वय ४४, रा. बेबेडओव्हळ, ता. मावळ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे बेबडओव्हळ येथे शिवमंगल हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एल एलईडी टीव्ही, साउंड, मिक्सर असा एकूण २४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
दुकानात काम करणा-या कामगाराने दुकानातील हजारो रुपये किमतीच्या मशीन चोरून नेल्या. ही घटना बुधवारी सकाळी एमआयडीसी भोसरी मधील श्री इंटरप्रायजेस या कंपनीत घडली.
पारस शर्मा रा. चोटीया, प्यासी, सलेमपूर, जि. देवोरीय, उत्तरप्रदेश असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी श्रीमंत ज्ञानदेव बोबडे वय 36, रा. इंद्रायणीनगर, भोसरी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.