नगरसेवकांसह आमदार सुनील शेळके यांची उपमुख्यमंत्र्यांशी भेट
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पठाण एम एस :
देहू नगरी राष्ट्रवादीमय झाल्यानंतर प्रथमच सर्व नवनिर्वाचित नगर सेवकांनासह आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घतली. देहू नगर पंचायतीतील 16 नवनिर्वाचित पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी पुणे येथे भेट घेतली झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देताना म्हणाले, ‘देहूकरांनी भरभरून दिलेल्या मतदानाबद्दल देहूच्या जनतेचे मनापासून आभार मानतो.राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून १७ पैकी १६ नगरसेवक निवडून आल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार सुनील शेळके व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच देहूमधील पाणी योजना,भूमिगत गटर योजना यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ, त्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा तातडीने पाठपुरावा करा व देहूकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जनतेची सेवा करा.’
त्यावेळी देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, माजी सभापती कांतीलाल काळोखे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्रवीण झेंडे, बाळासाहेब काळोखे, माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे,व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सुधीर काळोखे, योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, आदित्य टिळेकर, योगेश परंडवाल, मयूर शिवशरण, मीना कुऱ्हाडे, रसिका काळोखे, पूजा दिवटे, अनिता हगवणे, स्मिता चव्हाण, पौर्णिमा परदेशी, सपना मोरे, पूनम काळोखे, प्रियांका मोरे, ज्योती टिळेकर आदी उपस्थित होते.