प्रेस मीडिया ऑनलाईन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सद्य:स्थितीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शहरातील शाळा सुरु करु नयेत अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी महापालिका प्रशासनास केली.
कोरोना परिस्थितीमुळे अनेक दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्यानंतर राज्य शासनाने पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्यासंदर्भात निर्णय दिला. शहरातील रुग्णसंख्या, रुग्णवाढीचा दर आणि परिणाम पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आल्याचे राज्य शासनामार्फत सांगण्यात आले आहे.
वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु असून अद्यापही १००% लसीकरण पूर्ण झालेले नाही. तसेच १५ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणास अद्याप सुरवातही झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरु झाल्यास लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची काळजी घेऊन शासनाने दिलेले निर्बंध पाळून जास्तीत जास्त लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही महापौर ढोरे यांनी केले.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :94232 49331