महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कंत्राटी पद्धतीने जिजामाता रुग्णालयात काम करणा-या कर्मचा-यांचा बंद.
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कंत्राटी पद्धतीने जिजामाता रुग्णालयात काम करणा-या कर्मचा-यांचा दोन महिन्यांपासून पगार झाला नाही. म्हणून ११५ डॉक्टर, नर्स, आया-मावशी यांनी आज सोमवारी दि१७ पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे वैद्यकीय सेबा कोलंबळी आहे.
पगाराबाबत विचारणा केल्यास नावे लिहून घेतली जातात आणि कामावरुन काढण्याची धमकी दिली जाते. वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. त्यामुळे काम बंद करायचे नाही. रुग्णसेवा करायची पण आमची पगार होणार नाही का, नोव्हेंबर, डिसेंबरचा पगार नाही. जानेवारीचे 1१५ दिवस उलटून गेले. पगार कधी होईल याचे उत्तर कोणीच देत नाही. डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डेटा ऑपरेटर, मामा-मावशी, सुरक्षारक्षक अशा ११५ जणांचा पगार झाला नाही. एजन्सीवाल्यांनी एक तासाचा वेळ मागितल्याने आम्ही सकाळपासून काम करत होतो. पण आता काहीच सांगितले जात नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण काम बंद करुन खाली बसलो असल्याचे” एका कर्मचा-याने सांगितले. नागरिकांची गैरसोय होऊ नये याचा आम्ही विचार करतो. पण, आम्हाला पगार नाही मिळाला तर घर कशे चालवायचे, घरभाडे नाही दिले तर घर खाली करायला सांगितले जाते, असेही त्या म्हणाल्या.
आम्ही पूर्वी महापालिकेच्या माध्यमातून मानधनावर काम करत होतो. कोरोना काळात काम करत आहोत. पण, १ ऑक्टोबरपासून श्रीकृपा एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने काम करत आहोत. तेव्हापासून आम्ही एकही दिवस स्ट्राईक केला नाही. आमचा दोन महिन्यापासून पगार दिला नाही. त्याबाबत उत्तरही दिले जात नाही. पगार कधी होणार याची माहिती नाही. कोणीच जबाबदारी घेत नाही. एजन्सीकडे विचारणा केली. तर, महापालिकेला विचारा असे सांगितले जाते. पालिकेकडे गेलो तर एजन्सीला विचारा अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात”.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क:
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस 94232 49331