राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहर यांच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.




पिंपरी चिंचवड मावळ : प्रतिनिधी पठाण एम एस :

देहूरोड :  दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या जयंती व महाराष्ट्र पत्रकार दिना निमित्त  सर्व पत्रकारांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहर यांच्या वतीने     करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहर अध्यक्ष ॶॅड कृष्णा दाभोळे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. 


या वेळी आपले  मनोगत व्यक्त करताना ॶॅड कृष्णा दाभोळे  म्हणाले पत्रकारांनी की सर्व सामान्य कार्यकर्त्यांची व त्यांच्या कार्याची सुद्धा दखल व प्रसिद्धी पत्रकारांनी द्यावी.                        

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी मावळ तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले.                        कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे व दैनिक लोकमतचे पत्रकार राजेंद्र काळोखे यांच्या हस्ते दत्त मंदिरातील  त्रिगुनात्मक दत्तात्रेय यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून वंदन केले. देहू रोड पत्रकार संघाचे अध्यक्ष राम कुमार अगरवाल, दैनिक लोकमतचे पत्रकार देवराम भेगडे, आयबीएन लोकमत वृत्त वाहिनीचे गणेश दुडम,आज तक वृत्त वाहिनीचे समीर शेख, यांच्या संयुक्त हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



पत्रकार सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे( वृत्त संपादक द जस्ट आज राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे व  देहूरोड पत्रकार संघाचे  संस्थापक) मनोज पिल्ले (ज्येष्ठ छाया  मुक्त पत्रकार) पुण्यनगरीचे पत्रकार रमेश कांबळे, दैनिक पुढारीचे उमेश ओव्हाळ, दैनिक प्रभात व देहू रोड पत्रकार संघाचे  अध्यक्ष रामकुमार अगरवाल, दैनिक लोकमत प्रतिनिधी देवराम भेगडे, आयबीएन लोकमतचे मावळ प्रतिनिधी गणेश दुडम, द जस्ट आज वृत्तवाहिनी चे पुणे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे, आवास टुडे वृत्तवाहिनी प्रतिनिधी  इमरान शेख, प्रेस मीडियाचे  पिंपरी चिंचवड मावळ प्रतिनिधी मुशीम पठाण , प्रेस मीडियाचे पुणे  जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली  शेख , प्रजेचा विकास वृत्तवाहिनीचे विकास कडलक,  लोकशाही न्यूज चे सुशांत ठोंबरे, दैनिक लोकमतचे राजेंद्र काळोखे, दैनिक सकाळचे मुकुंद परंडवाल, या पत्रकारांचा राष्ट्रवादी देहूरोड शहर अध्यक्ष कृष्ण दाभोळे ,ज्येष्ठ नेते यदुनाथ डाखोरे, उपाध्यक्ष ॶॅड प्रवीण झेंडे, युवा नेते अतुल मराठे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आशिष बंसल, राष्ट्रवादी दक्षिण भारतीय देहूरोड शहराध्यक्ष शिवकुमार मुर्गन (बल्ली) ,अल्पसंख्याक अध्यक्ष शंकर स्वामी, धनंजय मोरे, शिवाजी दाभोळे, गणेश कोळी, विजय पवार, कैलास गोरवे, जाफर शेख, सागर निकम धीरज नायडु, मुकेश फाले, सोनु दाभोळे, धनराज शिंदे या पदाधिकाऱ्यांच्या सह महिला पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा शितल हगवणे, राजश्री राऊत,सुनिता विश्वकर्मा,बाॅबी डिक्का धनश्री दिंडे यांच्या हस्ते शाल स्नेहाचे प्रतीक गुलाब पुष्प वही पेन तसेच युवा नेते विजय मोरे यांनी पत्रकारांना भेट देऊन सन्मान केला.

पत्रकारांच्या सन्मानाला उत्तर देताना देहू देहूरोड पत्रकार संघाचे अध्यक्ष रामकुमार अगरवाल यांनी आम्हा पत्रकारांच्या वृत्तसेवेची जाणीव ठेवून जागतिक पत्रकार दिना निमित्त आम्हा पत्रकारांचा सन्मान केला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहराचे आभार मानून असेच स्नेह व सहकार्य राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.  तर पत्रकार समीर शेख यांनी त्यांचे मत मांडून यंदा छोट्या स्वरूपात हा सोहळा झाला पुढच्या वर्षी सर्व पक्ष व संघटनेच्या वतीने मोठ्या स्वरूपात पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मान्यवरांच्या उपस्थितीत देहूरोड शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आशिष बंसल यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी उपस्थितांनी एकमेकांना केक भरून अशिष बन्सल यांना शुभेच्छा दिल्या या वेळी सेवा भावी कार्या बद्दल सचिव विजय पवार यांचा सन्मान करण्यात आला.               

 या वेळी अक्षय वाघमारे, प्रमोद रोकडे, आकाश चंडालिया, अनिकेत वाघमारे, कृष्णा राजले, ॶॅड जालिंदर राऊत, शेखर झेंडे मावळ तालुका राष्ट्रवादी डॉ सेलचे अध्यक्ष डॉ राजेंद्र यळवंडे आदि उपस्थित होते.  

        

*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post