चिंचवड येथे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती ऑनलाईन माध्यमातून साजरी.



प्रेस मीडिया ऑनलाईन

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित संघवी केशरी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चिंचवड येथे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती ऑनलाईन माध्यमातून साजरी करण्यात आली. 

महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक मंडळ, इतिहास व राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रवीण जावीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. धीरज शाखापुरे व सांस्कृतिक कार्य अधिकारी प्रा. अभिषेक आकणकर यांनी दोन्हीही महान व्यक्तीमत्वांच्या जीवनावर उद्बोधक भाष्य केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गौतम भोंग हे होते. सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा. सचिन ओहोळ यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. तुकाराम सोळंके यांनी केले. गुगल मीटच्या माध्यमातून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.



जाहिरात व बातम्या साठी संपर्क : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

 9423249331

Post a Comment

Previous Post Next Post